*माणसं मनातली*
मोगाऱ्यच फुल ओंजळीत घेतल की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो. माणसांचं देखील असच असतं. काही माणस काही क्षणात मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात. तर काही कितीही सहवासात राहिली तरी त्यांची आतून ओढ नसतेच.
अशीच ऐक माझ्या मनात घर केलेली व्यक्ती म्हणजे *डॉ रूपा अगरवाल.* जी पी ए च्या सेक्रेटरी पदावर असताना झालेली माझी ओळख आज रूपा जी पी ए च्या प्रेसिडेंट पदावर विभूषित झालेली पाहतेय. रूपा सेक्रेटरी असताना बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करताना तळजाई badminton ग्राउंड वर प्रत्येकाला किटली तून चहा घेऊन येऊन आग्रहाने चहा देत होती. प्रत्येक खेळाडू चे बोलताना आपलेपणा ने विचारपूस, खेळाबद्दल चे कुउतुक करत होती. आम्ही तिला चाय वाली. अस चिडवल देखील. पण ती हसून काम करत राहिली. एव्हढेच काय रिकामे झालेले कप देखील गोळा करून ऐका जागी जमा केले तिने. प्रसंग छोटा च होता पण मनात घर करून राहिली तिची ती निगर्वी , मायाळू छबी.
नंतर अनेक प्रसंगांतून अनेक वेळा अनेक रुपात भेटत गेली ती. प्रत्येक रूप वेगळे , विराट आणि विशाल वाटले. मी गमतीने तिला म्हणते देखील रूपा तेरे कितने रूप.
कोणताही कॉन्फरन्स असो की CME तीची बौद्धिक चमक दिसून येतेच. इंग्लिश असो की मराठी वकतृत्वा समोरच्याचे लक्ष वेधून घेणारे. बोलण्यात नम्र आणि आर्जव भरपूर .
जितकी नम्र तितकीच करारी देखील.
कामाच्या बाबतीत म्हणाल तर Mrs perfectionist आणि वेळे बाबतीत काटेकोर. Very punctual.
ज्यांनी रूपा सोबत काम केलय त्यांना निश्चितच याचा प्रत्यय आला असेलच.
मला राहून राहून याच आश्चर्य वाटत आलेलं आहे की कस जमत हिला ऐव्हढ सगळ करून वेळेवर येणं.
रूपा आणि मुक्ता . मुक्ता charitable che kam pahile ki Rupa kharya अर्थाने कळते. मागे अश्याच ऐका कार्यक्रानिमित्त रूपा ची ओळख करून देण्याची माझ्यावर वेळ आली. तिचा भारदस्त CV me वाचला आणि अवाक झाले. कितीतरी नवीन गोष्टी ही करते ते मला त्या दिवशी समजले.
एखादा विषय म्हणतात ना कोळून पिलाय. तसे तिचे HIV संदर्भात म्हणता येईल. ती करत असलेलं कार्य. एड्सग्रत रुग्णाची करत असलेली सेवा, त्यांचे उपचार ते त्यांचे पुनर्वसन पर्यंत हे सगळं पाहिलं की कडक सल्यूट ठोकावा असे वाटते. Hatts off. त्या रूग्ण चे वेगवेगळे अनुभव yaikale की रोमांच उभे राहतात. कधी कधी समाज लोकांचा राग येतो. असं कसं वागू शकतात हे लोक
पण ती काम करत राहते निष्ठेने आणि जबाबदारीने. जणू काही ही बिघडले नाही असे वागत किंबहुना पुन्हा नवीन जोशाने अश्या अनेक प्रसंगांतून अनेक कुटुंबांना सावरायला सज्ज.
मुळातच हा रोग होऊ नये म्हणून , व्यसमुक्तीसाठी सुध्दा ऐक लढा उभा केलाय रूपा ने.तिची तळमळ , तिची धडपड दिसते त्या मागची. तरीही कोणताच मोबदला नव्हे साधं कौतुक सुध्दा न करून घेता ही चालत राहते चालत राहते पुन्हा पुन्हा लढा द्यायला. जो पर्यंत समाजातून या गोष्टी हद्दपार होत नाहीत तो पर्यंत.
एक व्रतस्त, भिडस्त व्यक्ती दिसते तुझ्यात रूपा.
मुक्ता चे डोंगरा येवढे काम असताना सुध्दा GPA chi dhura hi तितक्याच तन्मयतेने पहिली. GPA chi trip aso ki vaari, camp aso ki cultural program tuze astitwa प्रखरतेने जाणवते. तू म्हटलेली संपूर्ण पाठ असलेली गाणी, प्रयेका शी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा, तू केलेला ग्रेस फुल डान्स, तू ऑफिस स्टाफ ची सुध्दा घेतलेली काळजी हे सर्व जाणवत. पण तुझ्या नम्रतेने ते समोरच्याला कधीच ओझ वाटत नाही.
तुझी अभ्यासू वृत्ती, समोरच्या सुध्दा प्रेरित करत राहते. प्रत्येक भेटीत ऐक परीस स्पर्श मिळतो. ऐक नवीन उभारी, नवीन ऊर्जा घेऊन नाहीतरी आयुष्य भर जपून ठेवावेत असे अमूल्य क्षण घेऊन जातो आम्ही.
शेवटी काय तर आपण माणसाच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. स्वभावात गोडवा, शालीनता,आणि नम्रता असली तर तो माणूस सर्वांना हवाहवासा वाटतो.
असं माणूस भेटले की ते जोडाव आणि जपावं. मनाच्या अत्तर कुपीत .
आज gpa chya adhyaksh पदाचा पदभार ही देखील आव्हानातमक परिस्थिती आहे. Korona ani lockdown mule sagle anishchit astana देखील. ज्या प्रकारे तू हे सर्व सांभाळत आहेस ते वाखणाण्या सारखे आहे. अनेक उपक्रम यशस्वी रित्या राबविण्याचा तुझा मानस होता. आहे.
कितीही विपरीत परिस्थिती आली तरी तू ते करू सक्षिल हा विश्वास आहे. अध्य्षपदासाठी तुझे मनापासून Abhinandan.
तुला v sarv team la shubhechha..