About This Eventजनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे आणि नेक्स्टजेन GI मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे येथे आयोजित डॉक्टर्स डे सेलिब्रेशन २०२६, GP of the Year 2026 पुरस्कार वितरण सोहळा तसेच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अपडेट हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली, तर मान्यवर अतिथी म्हणून डॉ. दादासाहेब मैंदाड सर उपस्थित होते. कार्यक्रमातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विषयावरील दर्जेदार वैज्ञानिक व्याख्याने, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, फॅटी लिव्हर डिसीजवरील परिसंवाद आणि डॉ. वैभव काळे यांच्या “Doctor’s Laughter” या हास्यविनोदी स्टँड-अप सत्राने उपस्थित डॉक्टरांना ज्ञानासोबतच आनंद आणि उत्साहाची अनोखी पर्वणी दिली.
यावेळी GP of the Year 2026 हा जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉ. आर. डी. पवार यांना त्यांच्या जनरल प्रॅक्टिस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐🏆 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, वक्ते, पॅनेलिस्ट, प्रायोजक, आयोजन समिती, सर्व डॉक्टर बंधू-भगिनी तसेच GPA परिवारातील प्रत्येक सदस्य यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम अविस्मरणीय आणि यशस्वी ठरला. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🌷 जीपीए प्रेसीडेंट डॉ आप्पासाहेब काकडे