About This Event
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त आयोजित योग सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपस्थित राहिलेल्या सर्व डॉक्टर, त्यांच्या कुटुंबियांचे आणि मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
आपल्या सहभागामुळे हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण, प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला. विशेषतः योग प्रशिक्षक डॉ. प्रेरणा बर्वे यांचे मार्गदर्शन लाभल्याने सर्वांना योगाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. General Practitioners Association Pune आणि स्पोर्ट कमिटी च्या वतीने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवकांचेही मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
“योग हा निरोगी जीवनाचा पाया आहे. चला, योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया.”
🙏 धन्यवाद 🙏 डॉ. अप्पासाहेब काकडे अध्यक्ष, General Practitioners Association Pune (GPA Pune)